दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आयएनएस विक्रांत
दणक्यात लोकार्पण
दिस अति आनंदाचा
सुसंपन्नजलावतारण
समुद्रात लाटा स्तब्ध
रे अविस्मरणीय क्षण
जय जयकार भारता
महोत्सवचं विलक्षण
संपूर्ण स्वदेशी नौका
आत्म निर्भर जागरण
युध्दाच्या परिशब्दात
बदलले रे व्याकरण
कौतुक असे तंत्रज्ञाचे
अंगात आले स्फुरण
वाजे उस्फुर्त टाळ्या
विसरूनि राजकारण
अशा वेळी शिवबाची
सार्थ आली आठवण
समर्थ हवे सागर तट
जाणवी त्यांचे धोरण
नौदलाचा नवा ध्वज
राजेंना सादर अर्पण
धन्य शत धन्य झालो
लेकरे त्यांची आपण
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
www.kavyakusum.com