
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
उमरगा- उमरगा येते केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली काढून जाहीर निषेध केला सरकारने केलेल्या इंधन दरवाढ विरोधात शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्दर्शनाखाली , युवासेना सचिव मा.वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत युवा नेते किरण गायकवाड यांच्या नेतृत्वात युवा सेनेच्या वतीने भव्य सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
लवकरात लवकर गॅस चे दर कमी करावे व पेट्रोल डिझेल चे भाव हि कमी करावे अशी मागणी युवा सेना केली आहे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या सायकल रॅलीत, युवा सेना विधानसभा संघटक शरद पवार, युवा सेना माजी तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, युवा सेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, संदीप चव्हाण, बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, बळीराम सुरवसे, बलभीम येवते, आप्पाराव गायकवाड, काका गायकवाड, गोपाळ जाधव, मुजीब इनामदार श्री साठे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, शफी चौधरी, युवा सेना उपतालुकाप्रमुख संदीप जगताप, युवा सेना शहरप्रमुख अमर शिंदे, रोहित पवार,निखिल वाघ, आकाश मोरे, महादेव बिराजदार, गणेश माळी, श्रीशैल टोम्पे, माधव पाटील, शंकर मोरे, भगत माळी, महादेव बिराजदार, ओम जगताप, स्वप्नील सोनकवडे, योगेश शिंदे, साई विभुते, श्रीशैल टोम्पे, प्रदीप मोरे, प्रशांत पोचापुरे, नागेश गायकवाड, पंकज जगताप, अमोल पटवारी, श्रीनाथ मदनसुरे, वैभव गायकवाड, आदीसह युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.