
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
तालुका आरोग्य अधिकारी कंधार अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवडज येथे व पेठवडज सर्कल मधील सर्व उपकेंद्रामध्ये दि. ०१/११/२०२१ रोज सोमवारी सकाळी ८ ते रात्री ९ वाजे पर्यंत दिवस/रात्र कोव्हिड लसीकरण मेगा कॅप ठेवण्यात आला असून पुढील प्रमाणे गाव, केंद्र, उपकेंद्र, अधिकारी आहेत. १) पेठवडज-प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ८ ते ३ व पेठवडज गावात रात्री ६ ते ९ श्री. ए. एम. महाबळे शाखा अभियंता कंधार. २) गोणार – सिरसी (खु.) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गोणार येथे श्री. ईटकापल्ले पशुधन पर्यवेक्षक कंधार. ३) कळका – बोरी (बु.) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कळका येथे श्री. धोंडगे मंडळ अधिकारी कंधार. ४) मंगनाळी – वरवंट- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंगनाळी येथे श्री. होनराव डि. आय. शाखा अभियंता कंधार. ५) रूई – कल्लाळी – प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रूई येथे श्री. जाधव व्ही. डी. केंद्र प्रमुख ता. कंधार. ६) येलूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येलूर येथे श्री. मोरे सी. डी. केंद्र प्रमुख कंधार तरी या कोव्हिड लसीकरण मेगा कॅम्पचे आयोजन केले आहे तरी जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी कंधार यांनी केले आहे.