
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
पालघर जिल्हा.
पालघर जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील विशेष शिक्षक भरती व्हावी यासाठी डीएड,बीएड चे भावी शिक्षक २६ ऑक्टोबर पासून बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. तरीही प्रशासनाची चाल ढकल चालू आहे.
म्हणून आज पासून (दि. १ नोव्हेंबर २०२१) मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर ते मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या वर्षा बंगल्यावर *लॉंग मार्च* काढणार आहोत.
तरी सर्वांना आवाहन करतो की, आपल्या आदिवासी बांधवांच्या लढ्यात मोठ्या संख्येने मनापासून सामील होण्याचे आवाहन डीएड.बीएड. उपोषण कर्त्या भावी शिक्षकांनी केले आहे.
शासनाने व प्रशासनाने आश्वासने देऊन आमची घोर फसवणूक केली असून आता आम्ही आमचा न्याय लढा अधिक जोमाने लढू असा निर्धार केला आहे.