
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
पालघर जिल्हा.
ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षण व सामाजिक संस्था वाडा,ठाणे (पालघर ) या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय डाॅ.विरेंद्र भोईर सर (MA.PHD.DSM) यांचे हस्ते सन्मानपत्र, ट्रॉफी,गुलाब पुष्प देऊन ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम 31 ऑक्टोबर 2021 रोजी शासकीय रुग्णालय हाॅल वाडा जिल्हा पालघर येथे संपन्न झाला.
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्हासचिव प्रविण कांबळे,शिक्षक संघटना कार्यकर्ते निवास ठाकरे,जनार्दन पाटील, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे,आरोग्य सल्लागार अरूण बेनके,कर्मचारी महासंघ अध्यक्ष डी. डी.पाटील, वैद्यकीय अधीक्षक सुनील भंडागे, संस्था कार्यकारी सचिव वैभव भानुशाली उपस्थित होते.
शिक्षक अशोक गायकवाड हे भिवंडी तालुक्यातील मूळ बापगाव येथील रहिवाशी असून भिवंडी तालुक्यातील कोशिंबी केंद्रातील जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा येथे कार्यरत आहेत. 24 वर्ष 6 महिने त्यांची सेवा झाली आहे.
अशोक गायकवाड हे कास्ट्राईब शिक्षक संघटना-महाराष्ट्र राज्य कोकण विभाग उपाध्यक्ष तसेच सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. शाळा डोहोळेपाडा येथे कोरोना काळात *शाळा बंद पण शिक्षण सुरू* या उपक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षणप्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सतत विद्यार्थ्यांच्या घरी गृहभेटी देणे,कोरोनाविषयी जनजागृती करणे,दैनंदिन अध्ययन अध्यापन मार्गदर्शन करणे,पालकांचे प्रबोधन करणे,शाळेत 100%आदिवासी(अनुसूचित जमाती) विद्यार्थी असल्या कारणाने पालकांकडे स्मार्ट मोबाईल फोन नसल्याकारणाने जास्तीत जास्त Offline शिक्षण देणे,शाळेतच गटागटात अध्ययन अध्यापन करणे,शाळेत विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजीमहाराज अशा सर्व बहुजन महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम राबवून साजऱ्या करणे,वूक्षारोपण कार्यक्रम, अनेक शालेय व सहशालेय उपक्रम राबविने, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप करणे,समाजातील विधवा स्त्रियांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे,बूट वाटप करणे,जागतिक महिलादिनानिमित्त महिलांचा सन्मान सत्कार करणे,संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न करणे.संविधान रॅली काढून प्रचार प्रसार करणे.असे अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्य ते करत असल्याबद्दल त्याना *ज्ञानदीप पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले.
ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटना पदाधिकारी, सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संचालक व समाजातील सर्व स्तरातून शिक्षक अशोक गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.