
दिनांक 01/ 11 /2021 सोमवार
दैनिक चालू वार्ता
रायगड प्रतिनिधी
प्रा अंगद कांबळे
रोजी म्हसळा येथे *डॉ. मुईज शेख* साहेब यांच्या कामावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेऊन म्हसळा तालुक्यातील अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रिय कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा धड़काच सुरु झालेला आहे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष डॉ मोइज शेख यांच्या निवासस्थानी कुडतुडी येथील राष्ट्रवादीचे तरुण व तडफदार कार्यकर्ते श्री. सुनील मोरे यांनी राष्ट्रिय काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बाबाजान पठान शहर अध्यक्ष बाबा हूरजुक, जेष्ठ कार्यकर्ते रफ़ी घरटकर, तालुका उपाध्यक्ष दूवारकानाथ पाटिल, अशफाक काठेवाडी, या वेळी जेष्ठ कार्यकर्ते जहूरभाई हूरजुक हे असे म्हणाले की येणाऱ्या काळात अनेक पक्षाचे कार्यकर्ते आमच्याशी संपर्कात असून कॉंग्रेस म्हसळा
तालुक्यात बळकट होईल.
म्हसळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री मोरे यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले .