
दै.चालु वार्ता
सिल्लोड: प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :केंद्र सरकार करत असलेल्या सततच्या इंधन दरवाढी विरोधात आज युवासेनेच्या वतीने सिल्लोड येथे सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासैनिकांनी दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधून व काळे झेंडे घेऊन केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.
शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आले. सेना भवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील कार्यालय पासून पुढे भगवान महावीर चौका पर्यंत ही रॅली काढण्यात आली. या ठिकाणी नायब तहसीलदार प्रभाकर गवळी यांना शिवसेना – युवासेनेच्या वतीने निवेदन देऊन या आंदोलनाचा समारोप करण्यात आला.यावेळी माझ्यासह . जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, राजू राठोड, डॉ. संजय जामकर, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, सुदर्शन अग्रवाल, युवासेना उपजिल्हाप्रमुख अक्षय मगर, युवासेना जिल्हा सचिव शेख इम्रान (गुड्डू). जिल्हा सहसमन्वयक मारुती वराडे, तालुकाप्रमुख धैर्यशील तायडे, शहरप्रमुख शिवा टोम्पे यांच्यासह कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, नरसिंग चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या दीपाली भवर, मेघा शाह, स्नेहल कारले, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, मनोज झंवर, मतीन देशमुख, जितू आरके, सुनील दुधे, राजू गौर, नाना भवर, रवी रासने, गौरव सहारे, सचिन पाखरे, संजय कळात्रे, शंकर शिंदे, आशिष कुलकर्णी, कैलास इंगे, प्रभाकर बन्सोडे, रुपेश जैस्वाल, एकनाथ शिंदे, आनंद सिरसाट, फहिम पठाण,योगेश शिंदे, अमित कळम, रिजवान मुलतानी, सुभाष जाधव, संग्राम राजपूत, रमेश पालोदकर, सुनील लांडगे, विजय खाजेकर, अशोक कांबळे आदी युवासैनिकांनी उपस्थिती होती.