
दै चालु वार्ता
प्रतिनिधी:अरुण भोई दौंड
राजेगाव मध्ये ग्रामपंचायत विकास आराखडा साठी बैठक पंचायतराज मध्ये ग्रामसभेला अनन्य साधारण महत्व आहे. ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीच्या कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहचावा म्हणून, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली.
प्रत्येक गावातील ग्रामसभा ही गावांचे हक्काचे व्यासपीठ असते. ती गावातील ‘लोकसभा’ असते. गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे, गावाच्या विकासाच्यादृष्टीने ग्रामपंचायतीला सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे झाले तर, ग्रामपंचायतीच्या कारभारात गावातील ग्रामस्थांचा सहभाग असेलेले गावातील लोकांचे व्यासपीठ म्हणजेच ग्रामसभा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. राजेगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा अगदी आनंदाचा आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी ग्रामपंचायत राज्य गावचे सरपंच प्रवीण लोंढे ग्रामसेवक पाहुणे भाऊसाहेब कृषी सहाय्यक ढवळे मॅडम ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते