
दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
मौजे तुंगत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे मधुकर जनार्दन रणदिवे यांच्या शेतातील शॉर्टसर्किटने सात एकर ऊस जळून खाक झाला तरी शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले मधुकर जनार्धन रणदिवे व दमयंती अभिमान रणदिवे यांचा तीन एकर ऊस व कादर याकूब मुलाणी व रमजान मुलाणी यांचा चार एकर ऊस जळून खाक झाला तरी शेतकऱ्यांचे तत्परतेने कोणतीही जिवित हानी झाली नाही व ऊस शेतीचे नुकसान झाले आहे तरी वीज वितरण कंपनी व तलाठी साहेबांनी लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी . अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी शिवाजी मधुकर रणदिवे व बाळू मुलाणी यांनी केली.