दै चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी-सुशिल घायाळ
मंठा तालुक्यातील जवळपास पंधरा हजार निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर दीड कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष संतोष वरकड यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील निराधारांची दिवाळी गोड होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे.बोराडे यांनी दिवाळीपूर्वी निराधारांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात यावे अशी सूचना केली होती. संजय गांधी अनुसूचित जमाती योजनेच्या 289 लाभार्थ्यांच्या खात्यावर जुलै 2021 चे मानधन टाकण्यात आले आहे. श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना सामान्य ऑगस्ट 2021 चे 7109 लाभार्थी, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती सप्टेंबर 2021 चे 233 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जुलै 2022 चे 5487 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना जुलै 2021 चे 195 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना जुलै 2021 चे 17 लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना सप्टेंबर 2021 चे 195 लाभार्थी, संजय गांधी अपंग निराधार योजना सप्टेंबर 2021 चे 17 लाभार्थी, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना सामान्य सप्टेंबर 2021 चे 1626 लाभार्थी असे एकूण जवळपास पंधरा हजार निराधारांच्या खात्यावर 1 कोटी 48 लाख 49 हजार 400 रुपये खात्यावर जमा करण्यात आले असून निराधारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निराधारांची दिवाळी गोड व्हावी म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संतोष वरकड, सदस्य सुधाकर सोनटक्के, गयाताई पवार, संतोष गधे, विष्णू चव्हाण, राजेंद्र खरात, तुळशीराम कोहिरे, बालासाहेब घनवट, भारत खराबे, प्रकाश घुले व संजय गांधी निराधार योजना समितीचे नायब तहसीलदार व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.