
29 डिसेंबर 2021रोजी मुंबई येथे होणार शानदार समारंभ सोहळा
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी
सचिन मुगटकर
पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र प्रभारी तथा तेजपुंज न्यूज चे मुख्य संपादक अरविंद जाधव यांना 2021 यावर्षीचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे दिला जाणारा पत्रकार क्षेत्रातील अती महत्त्वाचा समजला जाणारा “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पण पुरस्कार” जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे दिनांक 29 डिसेंबर 2120 रोजी मान्यवर मंडळीच्या हस्ते होणार आहे. त्यांना यापूर्वीही पत्रकारिता क्षेत्रातील पुढील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे,2010 ते 2011 या वर्षी” दैनिक एकमत चा सन्मानपत्र पुरस्कार”,दिनांक 12 मार्च 2011 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट पत्रकार ते साठी दिला जाणारा राज्यस्तरीय शब्दसामर्थ्य पुरस्कार देऊन गौरव,दिल्ली नोएडा सेक्टर 57 येथे सुदर्शन टीव्ही चॅनेल चा पुरस्कार,नांदेड येथे जिल्हाधिकारी धीरज कुमार व पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव यांच्या हस्ते दिनांक 23 /11/ 2013 उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान,दिल्ली येथे सुदर्शन टीव्ही चॅनेल चा ब्रॉडकास्ट ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सन्मानपत्र देऊन सन्मान,हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञावंत पत्रकार गौरव करून सन्मानपत्र देऊन सन्मानित केले, राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्यावतीने इंदोर येथे पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले,
नैनिताल येथे पत्रकार प्रेस परिषद ऑल इंडिया च्या वतीने दिला जाणारा नेशनल अवार्ड सन 2017 मध्ये सन्मानित करण्यात आले,
डेहराडून येथे प्रेस कौन्सिल च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान,नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारीतेतील पुरस्कार,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शोध पत्रकारिता उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविले,पत्रकार प्रेस परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कृष्णदेव मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आदीसह विविध सेवाभावी संस्था प्रतिष्ठान यांच्या वतीने दिले जाणारे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त त्यांना यापूर्वी प्राप्त झालेले आहेत . त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय गुणी रत्न पुरस्कार जाहीर होतात त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.