
आष्टा-आष्टावाडी ग्रामस्थांचा विविध मागण्यासाठी महावितरण कंपनीच्या विरोधात सामूहिक आत्मदहन व रास्ता रोको आंदोलन
महावितरण कंपनीच्या अधिकार्यांच्या मनमानी कारभार मुळे नागरिक त्रस्त
दैनिक चालू वार्ता
भुम प्रतिनिधि नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील आष्टा-आष्टावाडी ग्रामस्थांचा विविध मागण्यासाठी महावितरण कंपनीच्या विरोधात सामूहिक आत्मदहन व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या ६ ते ७ वर्षापासून लेखी व तोंडी स्वरूपात दोन्ही गावे व दलीत वस्तीसाठी लाईट चे काम करण्यासाठी कनिष्ठ अभियंता माणकेश्वर व उपविभागीय अभियंता भूम यांना वारंवार पाठपुरावा करून, मुद्दा क्रमांक १) डी.पी.डी.सी. अंतर्गत मौजे आष्टा-आष्टावाडी ता भूम येथे तसेच बाळूमामा(वाघमारे दलित वस्ती) थ्रीपेज,४ वापर १.२ की.मी.एल . टि.लाईन बसवणे.२) गावठाण मौजे आष्टा ता.भूम येथील कुजलेले लोखंडी पोल,तारा दुरुस्त करणे.३) बारीकराव (अनीरुद्र) फकीरा माळी यांच्या घराजवळ डी.पी इतरत्र स्थलांतरित करणे.४) मोजे आष्टा येथे पूर्वीचा डी. पी क्र १ ६३ के व्ही ऐवजी १०० के व्ही करणे. वरील सर्व मंजूर कामे संबंधित कनिष्ठ अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्या अकार्यक्षमतेमुळे अद्याप पर्यंत झाली नाहीत म्हणून त्याच कामे व मागण्या पुन्हा पाठपुरावा करून आपणास सादर केल्या आहेत.सदर निवेदन दि १४-०७-२०२१, दि ०४-०८-२०२२,२०-०८-२०२१ रोजी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मा. विभागीय कार्यालय उस्मानाबाद यांना आष्टा- आष्टावाडी सरपंच सुनिल जाधव, भूम तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी समाजिक न्याय विभाग,रवींद्र बाबुराव वाघमारे आष्टा यांनी आष्टा व आष्टावाडी येथील वाढीव गावठाण,वाढीव दलित वस्तीसाठी थ्रीफेज,फोर वायर,व दुरुस्ती लाईट चे कामे करीत देण्यात निवेदन आले आहे. सदरील मागण्या तातडीने मंजूर व मान्य न झाल्यास उग्र आंदोलन व सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर ५६ च्या वर नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.रस्ता रोको आंदोलन करते वेळी सरपंच,उपसरपंच,सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व असंख्य नागरिक उपस्थित होते.