
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नाशिकः मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे दोघे एकाच व्यासपीठावर येणार म्हटल्यानंतर ते काय बोलणार याची चर्चा आदीपासूनच सुरू होती. अन् अपेक्षेप्रमाणे जुन्या समीकरणाला पुन्हा एकदा छगन भुजबळांनी बळ देत येत्या काळात वाऱ्याची हवा फिरली, तर राजकारण कसे जाऊ शकते याची झलकही दाखवून दिली. खरे तर सोमवारी भुजबळ आणि पंकजा यांनी नाशिकमध्ये जवळपास तीनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यात पहिला कार्यक्रम संदर्भसेवा रुग्णालयाचा होता. याचे आयोजन भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केलेले. दुसरा कार्यक्रम बँकेच्या लोकार्पण सोहळ्याचा झाला आणि तिसरा महात्मा फुले पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाचा. याच कार्यक्रमात भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसी तितुका मेळवावा अशी हाक दिली. यावेळी भुजबळांनी आपल्या तडाखेबंद शैलीत भाषण केले. ते म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री असते, तर OBC बाबत अडचणी झाल्याच नसत्या. गोपीनाथ मुंडे असते, तर आम्हालाही काही अडचण झाली नसती,असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील शल्य यावेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ओबीसी जनगणना, ओबीसी आरक्षणावर जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व राहील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.तसेंच
OBC आरक्षणावर जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व राहील, असा नारा नाशिकमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांनी देत पुन्हा एकदा ओबीसी लढ्याला धार दिली.