
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीचं ग्लास्गोला, ब्रिटन येथे ‘मोदी है भारत का गेहना’ हे गाणं गाऊन सुरेल स्वागत झालं. मोदी हॉटेलमध्ये पोहोचताच तिथे जमलेल्या भारतीयांनी मोदींच्या स्वागतासाठी जल्लोष सुरू केला. मोदींनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय लोकांमधल्या एका लहान मुलाशी संवादही साधला. तसेंच
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस- 1 आणि 2 नोव्हेंबरला ग्लासगो, ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटनमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या 26 व्या हवामान बदलावरील जागतिक परिषदेत ते सहभागी होणार आहेत. हे G20 शिखर परिषदेचं दुसर सत्र आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.
G20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रासाठी मोदी गेले तीन दिवस रोम, इटलीमध्ये होते. रोममधुन निघतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, रोम शिखर परिषदेदरम्यान, महामारीशी लढा, आरोग्य पायाभूत सुविधा सुधारणे, आर्थिक सहकार्याला चालना देणे आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे यासारख्या जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. COP26 शिखर परिषदेत हवामान बदल कमी करण्यासाठी, या संदर्भात भारताच्या प्रयत्नांना स्पष्ट करण्यासाठी आणि इतर जागतिक नेत्यांसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असं पंतप्रधान मोदीं म्हणाले.