
दैनिक चालू वार्ता /
प्रतिनिधी राहुल रोडे /
लातूर : – (उदगीर)येथील दि.१७ सप्टेंबर रोजी लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात ‘१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन‘ उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार तर प्रमुख अतिथी म्हणून शंकर वाघमारे तसेच मंचावर डॉ.संजय कुलकर्णी,व्यंकटराव गुरमे,बालाजी चटलावार,षन्मुखानंद मठपती, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदिप कुलकर्णी,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या भित्तीपत्रकाचे व ०१व ०२ ऑक्टोबर २०२१रोजी विद्यालयात होणाऱ्या ४२ व्या मराठवाडा पातळीवरील लाल बहादुर शास्त्री ऑनलाईन आंतरशालेय वादविवाद स्पर्धेच्या माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करण्यात आले.तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी शंकर वाघमारे यांनी १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामाविषयी सविस्तर अशी माहिती सांगितली.रजाकाराच्या विविध घटना व प्रसंगाविषयी सांगितले,तसेच या मराठवाडा मुक्तीसाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला.या लढ्यात आर्यसमाजाचे योगदान खूप मोलाचे आहे.कारण पहिला हुतात्मा त्यांचा उमरगा तालुक्यात झाला.असे मत मनोगतात त्यांनी व्यक्त केले.
त्यानंतर अध्यक्षीय समारोपात मधुकर वट्टमवार यांनी सांगितले की मराठवाडामुक्ती साठी आपल्या जनतेने खूप कष्ट सोसले,आपल्या उदगीर शहरातील भुमीपूत्रांनी म्हणजेच श्यामलालजी,बंसिलालजीने मराठवाडा मुक्ती संग्रामात मोलाचं योगदान दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया गोविंदवाड,प्रास्ताविक व परिचय निता मोरे ,वैयक्तिक गीत शिल्पा सेलूकर,आभार विठ्ठल पस्तापूरे तर माधव मठवाले यांनी वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख निता मोरे,सहप्रमुख ज्योती घोडके,अभ्यासपुरक मंडळ प्रमुख अनिता येलमटे,संतोष गजलवार,संतोष कोले,विनायक इंगळे,गुरुदत्त महामुनी,छाया दिक्कतवार,बालाजी खोडवे,विष्णू तेलंग व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.