
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड येथील कोषागारामार्फत सेवा निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी ज्यांचे सन २०२१-२२ एकत्रित निवृत्तीवेतन ५ लाख ५० हजार रुपये व त्यापेक्षा जास्त आहे त्यांनी आपला आयकर सुट मिळण्यासाठी पात्र बचतीचा तपशील बुधवार १० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्जासोबत पुराव्यासह कोषागारात सादर करावा. अन्यथा नियमाप्रमाणे आयकर कपात करण्यात येईल .आयकर वसुलीचे नवीन नियम सेक्सन – ११५ बिएसी नुसार नवीन कर व्यवस्था व जुनी कर व्यवस्था असे दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. यापैकी आपणास जो पर्याय आयकर कपातीसाठी निवडावयाचा आहे. त्याची माहिती १० डिसेंबर २०२१ पुर्वी कळविण्यात यावी अन्यथा जुनी कर व्यवस्था हा विकल्प स्विकारल्याचे गृहीत धरून नियमाप्रमाणे आयकर कपात करण्यात येईल. कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी आयकरासाठी कोणतीही बचतीची माहिती सादर करू नये. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.