
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील खुशाल आत्माराम सोमासे याची भारतीय सैन्य दलातील(ITBP)पदाची ६ महिन्याची ट्रेनिंग पुर्ण होऊन गावी परत आले असता त्यांचे गावामध्ये जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले व आई वडिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सर्व गावाकरी मंडळी मित्रपरिवार सहभागी झाले.कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणे युवा वर्गाचा सहभाग होता त्यामध्ये सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे ग्रा. स.श्रीकांत मंगनाळे, नवाज चौधरी ,श्रीकांत मंगनाळे,शुभम जारीकोटे, गौस चौधरी , मारुती सोमासे,शिवराज मंगनाळे असंख्य युवावर्ग सहभागी होते व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.