
दैनिक चालु वार्ता
पन्हाळा प्रतिनिघी शहाबाज मुजावर
किल्ले पन्हाळागडावर इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव
आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिपावली सण उत्साहात कशी साजरी करायची याचा संकल्प करून कोल्हापुर हायकर्स ने हा अनोखा उपक्रम पन्हाळा गडावर साजरा केला त्यांचे हे नववे वर्ष आहे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्याविषयी काय
ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय तेच गड – किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात.एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना कधी पाहायला मिळणार दिपावली कधी अनुभवणार ते गडकोट देखील दिपावलीची सांज म्हणूनच कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले “एक सांज पन्हाळगडवर” स्वराज्याच्या गडकोटांवर वर्षभर अपरिचित गड किल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून कोल्हापूर हायकर्स या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात कोल्हापूर हायकर्स नेहमीच पुढे असतात.
आपण आपली दिपावली कायम घरातच साजरी करत असतो, पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात.
नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या आठ वर्षापासुन पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी पन्हाळा न्यायाधीश रीतेष मावतवाल, नगराध्यक्षा रुपाली धडेल व उपनगराध्यक्षा पल्लवी नायकवडी यांच्या उपस्थितीत शिव मंदिराचे पूजन करून या दीपोत्सवाची सुरुवात झाली.
या कार्यकमास रविंद्र धडेल व आजी माझी नगरसेवक तसेच पत्रकार नितीन भगवान हानिफ नगारजी उपस्थित होते.