दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिक, लढ्याची माहिती यावर आधारित चित्रप्रदर्शन ज्ञानात भर घालणारे आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
सिद्धार्थ उद्यानात सकाळी 9.30 ते सायं. 6.30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असलेल्या चार दिवशीय प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. कराड यांनी प्रदर्शनास भेट दिली. त्यांच्यासमवेत प्रशांत देसरडा, मोहन आघाव आणि महेश माळवदकर होते. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी डॉ. कराड यांचे स्वागत केले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून, जिल्हा माहिती कार्यालय आयोजित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या सहकार्याने प्रदर्शन भरवले आहे. नागरिक, अभ्यासकांचा प्रदर्शनास चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे डॉ. कराड यांना श्री. चिलवंत यांनी यावेळी सांगितले.