दैनिक चालु वार्ता परभणी उपसंपादक – दत्तात्रय कराळे
रेल्वे व बस स्थानक परिसर, जिंतूर रोड, जेल कॉर्नर आदी ठिकाणांहून प्रवासी वाहतूक करणारे ऑटो चालकांकडे नियमानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आलेल्या ३७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक पोलिसांनी त्या बाबतीत वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने हा दंडात्मक कारवाईचा पवित्रा वाहतूक पोलिसांना घेणे भाग पडले असल्याचे समजते.
ऊसतोड कामगारांपर्यंत पोहोंचवा
शासकीय योजना -जिल्हाधिकारी
“”””””””””””””””””'””””””””””””””””””””””””
ऊसतोड कामगारांसाठी उपलब्ध शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक अशा ज्या शासनाच्या योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.
आ. मेघना बोर्डीकर आयोजित ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात जिल्हाधिकारी आंचल गोयल बोलत होत्या. त्यावेळी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते.
गावगाड्यात उडाला धुरळा
“”””””””””””””””””””””””””””””””””
शिंदे गट-भाजपाची सर्वाधिक बाजी; आघाडीला मोठा फटका
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ग्रा. पं. निवडणूकीत शिंदे गट-भाजपाने मोठी बाजी मारली आहे. सर्वाधिक सरपंचपदाचा झेंडा फडकावत आघाडीला जबरी फटका दिला आहे.
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंदे गटामुळे मोठी किंमत चुकवावी लागली असून त्याची झळ कॉंग्रेस राष्ट्रवादीलाही बसली आहे