दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
———————-
देगलूर( दि.२१) देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त दि.१७ सष्टेंबर २०२२ ते दि.०२ ऑक्टोंबर २०२२ महात्मा गांधी जयंती या काळात सेवा पंढरवाडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी खानापूर व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी,अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यामध्ये जवळपास400 रुग्णांनी नोंदणी केली होती . तर 350 जणांची तपासणी व 350 पैकी 60 मोतीबिंदू आणि 60 पैकी 22 जणांना आज उदगीर येथे नेण्यात आले .व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,गंगाधरराव जोशी भाजपा संघटन मंत्री नांदेड,प्रविन पाटील चिखलीकर,लक्ष्मणराव ठक्करवाड,श्रावण पाटील भिलवंडे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कनकट्टे,अनिल पाटील खानापूरकर (उपसरपंच खानापूर) अशोक डुकरे सर (भा.ज.पा तालुका सरचिटणीस) राजेंद्र मुरगे, विनोद रायकोडे, श्रीरंग बेलबुटे दिगंबर यनलवार, कबीरदास सूर्यवंशी, पिराजी लाळे, मारोती लाळे, विठ्ठल दुद्दलवार,साईनाथ परबते, शिवानंद हेंटे,व भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.