दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा तालुक्यातील कारेगाव जवळ एका हरणाचा अपघात झाला असता त्या जखमी हरीणा च्या मदतीला कारेगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्र. दत्ता पाटील दिघे धावले व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती देऊन त्यांनी त्या हरणाला लोहा पशु वैद्यकीय दवाखान्यात नेऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित उपचार करुन त्या हरीणाला वनविभागाकडे सुपुर्द केले.
याबाबत कारेगाव चे चेअरमन प्र.दता पाटील दिघे यांनी दिलेली माहिती अशी की, लोहा तालुक्यातील मौजे कारेगाव शिवारात आज दि. २० सप्टेंबर रोजी ९ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने एका हरीण (गाभण मादीस ) धडक देऊन किरकोळ जखमी केले व त्या हरीणास मुका मार लागला असता ती हरीण रस्त्यांच्या खाली कडेला चिखलाजवळ बसले असता त्यावेळी या जखमी हरीणा ला दता पाटील दिघे यांनी आपल्या गाडीत बसवून लोहाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले व याबाबत वनविभागाचे कर्मचारी घुगे व शेवडीकर यांना माहिती दिली व त्यांच्या उपस्थितीत लोहा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुसंवर्धन विकास अधिकारी वसुधा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनउपचारक अजय झाडे यांनी जखमी हरीणावर उपचार केला व वनरक्षक परमेश्वर घुगे ,वन कर्मचारी एन .सी. शेवडीकर यांच्या कडे सुपूर्द केले.
यावेळी दत्ता पाटील दिघे यांना न्यु इंडीया इन्शुरन्सचे प्रतिनिधी बालाजी लमदाडे यांनी मदत केली.