दैनिक चालु वार्ता /
परमेश्वर वाव्हळ /
पिंपरी प्रतिनिधी
पुणे :- परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्राच्या वतीने आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी परिवर्तन आंतरजातीय केंद्राच्यावतीने मोफत ऑनलाईन वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन वीरतुळ पुणे येथे करण्यात आले आहे. सदरील मिळवा हा दि, १९ सप्टेंबर रोजी चार ते सहा या वेळेत आयोजित केलेला आहे. तरी इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन परिवर्तन विवाह केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान ही नाव नोंदणी मोफत असल्याची माहिती परिवर्तन केंद्राने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्राने समाजातील जाती-उपजाती या सारख्या जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हि अतिशय काळाची गरज असून, राज्यभरातील युवा मुले, मुली जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करत असून, वेगवेगळ्या केलेल्या संशोधनातून असे निर्दशनास आले आहे की, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांची मुले-मुली अनेक क्षेत्रात अग्रगण्य व हुशार असतात. नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांची मुले-मुली हे शारीरिक व मानसिक विकलांग असण्याची शक्यता जास्त असते.जर जितक्या वेगवेगळ्या जाती उपजाती एकत्र आल्यास जास्त प्रमाणात त्यांचे आपत्ती सक्षम व हुशार असतात. तर ही अंतरजातीय चळवळ पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे येण्याची आवश्यकता आहे. जातीचे निर्मूलन करण्यासाठी रोटी व्यवहार महत्त्वाचा नसून, बेटी व्यवहार होणे हे देखील महत्त्वाचे आहे. तरच खऱ्या अर्थाने जात नष्ट होऊन आंतरजातीय कुटुंब व्यवस्था पुढे येण्यास मदत होईल. तरी जास्तीत जास्त युवा तरुणांनी या आंतरजातीय विवाह मेळाळ्यास आपली नाव नोंदणी करून, सहभागी व्हावे. असे आवाहन परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्राने केले आहे.