
दै .चालू वार्ता : प्रतिनिधी :केंद्रे प्रकाश
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात सरकार 75 नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सची निवड करून त्यांना प्रोत्साहन देईल, अशी घोषणा विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागावाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)डॉ. जितेंद्र सिंह यांनी,मोहाली येथील राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था (एनएबीआय ) येथे आज अत्याधुनिक 650 टेराफ्लॉप सुपरकंप्युटिंग सुविधेचे उद्घाटन करताना केली. नवीन सुपरकंप्युटिंग सुविधा ही टेलिमेडिसीन, डिजिटल हेल्थ, एम हेल्थ सह बिग डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात काम करणार्या या स्टार्ट-अप्ससाठी सुविधा प्रदान करेल, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेबद्दल बोलताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, पुण्याच्या सी-डॅक च्या सहकार्याने राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग अभियान (एनएसएम ) अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.ही उच्च श्रेणी