दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:-दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी महात्मा बसेश्वर महाविद्यालय लातूर येथे प्रदान करण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मा. शेषेराव ससाने सर यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात खूप मौलिक काम असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे त्याबद्दल त्यांचे सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे व त्यांच्या सर्व शिक्षक संघटने कडून त्यांचे कौतुक होत आहे