
दै .चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी :केंद्रे प्रकाश
धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी, केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री श्री गिरीराज सिंह यांनी ,ग्रामीण महिलांना त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक वाढविण्यासाठीच्या मार्गांसंदर्भात मार्गदर्शन केले. हे प्रेरणादायी आणि महत्त्वाकांक्षी ‘मिशन रु.1 लाख’ असल्याचे सांगून मंत्री म्हणाले की, ग्रामीण जीवनात लक्षणीय बदल घडवणारा उपक्रम सिद्ध होईल.
श्री गिरीराज सिंह यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ग्रामविकास मंत्रालयाच्या दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या वतीने महिला उत्पादक कंपन्यांच्या संचालक मंडळासोबत आयोजित केलेल्या संवादात त्यांनी महिलांना हा मंत्र दिला. या संवादासाठी महाराष्ट्र, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून पाच उत्पादक कंपन्यांची निवड करण्यात आली यात महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या इकोव्हन स्वावलंबी महिला शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित चा समावेश होता.
सहभागींची प्रगती, यशोगाथा, आव्हाने आणि आकांक्षा या मंत्र्यांनी संयमपूर्वक ऐकून त्यांना पुढील वाटचाली साठी मार्गदर्शन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेच्या भावनेने, श्री गिरीराज सिंह यांनी उपस्थित महिलांना प्रेरित केले. स्वयंसहाय्यता गटाचे काही सदस्य वार्षिक 1 लाख रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य करतात हे पुरेसे नाही. गटातील सर्व सदस्यांनी हे उद्दिष्ट प्राप्त केले पाहिजे. ‘आत्मनिर्भर भारत’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपले उत्पन्न कसे वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे, योजना तयार कराव्यात आणि त्या सामायिक कराव्यात असे सांगत मंत्र्यांनी उपस्थित ताईंना मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य सरकारे त्यांना हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साकार करण्यास मदत करतील, असे त्यांनी सांगितले.