दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांच्याविरोधात आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. इंदापूरात शिवसैनिकांच्या वतीने रामदास कदम यांचा निषेध करत जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी कदमांच्या पोस्टरला जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचे दहन करत आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थिती होते. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा इंदापूर तालुक्यातील शिवसैनिकांकडून जोरदार समाचार घेण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे, उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, तालुका समन्वयक अरुण पवार ,शहर प्रमुख महादेव सोमवंशी, शिवसेना युवा अधिकारी सचिन इंगळे, शहर युवा अधिकारी आविनास खंडागळे ,शिवसैनिक वसंत आरडे उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे, विभाग प्रमुख रणजित बारवकर ,अंकुश गलांडे, उपशहर प्रमुख दादा देवकर बालाजी पाटील अशोक देवकर ,बंडू शेवाळे ,उपविभाग प्रमुख हेमंत भोसले ,अमित बामणे, महादेव सकुंडे, शाखाप्रमुख अभिजीत पाटील ,हनुमंत कांबळे ,देवा मगर ,संतोष शिरसागर ,प्रदीप पवार ,योगेश मिसाळ, सनी ढावरे ,नितीन मिसाळ व शिवसैनिक उपस्थित होते