दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार -बाजीराव गायकवाड
कंधार:- बाचोटी येथील रामा गणपती अशोकवाड या शेतकऱ्याने दिनांक 19 सप्टेंबर रोजी बैलाला पाणी पाजवण्यासाठी मन्याड नदीजवळ गेले असता बैलाने धक्का दिला व रामा तीन दिवसाच्या नंतर चिंचोली शिवारात मिळाला सापडला ही घटना बाचोटी येथील शेतकऱ्याची आहे याप्रकरणी कंधार पोलीस स्टेशन मध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली
बाचोटी तालुका कंधार येथील रामा गणपती अशोकवाड वय 36 वर्ष या शेतकऱ्याने दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास शेतीचे काही कामे करून बैलाला पाणी पाजण्यासाठी शेतालगतच मन्याड नदी पात्रात जवळ जाऊन बैलाला पाणी पाजू लागले होते यावेळी यातील एका बैलाने रामाला धक्का दिल्यामुळे रामाचा पाय घसरला आणि रामा नदी पात्रात वाहून गेला रामाला पाहता येत नसल्यामुळे बैल पाणी पिऊन घराकडे धावत गेले रामा तब्बल दोन दिवसापासून मिळत नसल्यामुळे कंधार पोलीस स्टेशनला सदर व्यक्ती दोन दिवसापासून नसल्याची तक्रार ही नोंद होती अशी माहिती त्यांच्या उत्तम जिलेवाड नातेवाईकांनी दिली दिनांक 21 सप्टेंबर रोजी रामाचा मृतदेह चिंचोली शिवारात गोविंदराव कौसले यांच्या शेतालगतच मन्याड नदी असून रामाचा मृतदेह दिसून आला यावेळी बालाजी अशोकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलीस पाटील तेलंगे यांनी ही घटना कळवली घटनास्थळी कंधार पोलीस स्टेशनचे अमलदार ये एस आय गणाचार्य यांच्यासह त्यांचे साथीदार पोहोचून पंचनामा केला केला यावेळी बारूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश दुलेवाड स्वान इच्छेदन केले रामाच्या पश्चात पत्नी आई-वडील भाऊ असे परिवार होता याप्रकरणी सदर तपास ए एस आय गणाचार्य हे करीत आहेत