दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : महापालिकेच्यावतीने शहराच्या विविध भागात उभारलेल्या १२०० सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांऐवजी, आता खाजगी ठेकेदार कंपनीकडून माध्यमातून करण्यात येणार आहे. याकरिता पाच वर्षांसाठी ५२ कोटी ५३ लाख रूपयांचा खर्चाच्या निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेची सध्या यंत्रणा आहे. या यंत्रणेवरही वर्षाला कोट्यावधी रूपये खर्च केले जात असले तरीही, शहरातील बहुतांशी स्वच्छतागृहे नेहमीच अस्वच्छ राहत आहेत. सार्वजनिक युरिनल आणि सार्वजनिक शौचालयांचीही दुरावस्था, तेथील अस्वच्छता व दुर्गंधी हीच या स्वच्छतागृहांची ओळख बनली आहे. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सर्व स्वच्छतागृहांची साफसफाई मनपा कर्मचारी करतात, तरीही ती नेहमीच अस्वच्छ असतात.
या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या सर्व स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी, निविदा काढून खासगी संस्थांची नेमणूक केली जाणार आहे. पाच झोनसाठी वेगवेगळ्या पाच निविदा काढण्यात येणार आहेत. अशी माहीती आयुक्तांनी दिली.