दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुंबई-संभाजी गोसावी
गेले दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनांमुळे राज्य सरकारकडूंन शासकीय नोकर भरतीचे कोणतेच आदेश जारी करण्यांत आले नव्हते. मात्र बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ७५ हजार पोलिसांची वेगाने भरती होणार असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहेत. सध्या ७२३१ पदना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रतिक्रिया सुरु असल्यांची माहिती यावेळी देण्यांत आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यांत येईल. यासाठी मुंबईतील २० मैदानावर संपूर्ण तयारी करा तसेच मैदानावर कॅमेरेची यंत्रणा तयार ठेवा कुठल्याही परिस्थिंतीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठल्याही तक्रार येता कामा नयेत अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या तसेच राज्यांतील पोलीस शिपाई पोलीस निरीक्षक यांना आता १२ वरुन आता यापुढे २० इतक्या रजा वाढवण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यांत आला. तसेच राज्यांतील कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक अशा दर्जेतील अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होतील असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.