दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- तक्रारदार यांच्यावर कलम ११० प्रमाणे दाखल असलेली प्रतिबंधक केस निकाली काढण्याकरिता स्थानिक गुन्हें शाखा,अमरावती ग्रामीण येथील पोलीस कर्मचारी श्री.हरणे व श्री. ढोके यांनी तक्रारदाराला १५०० रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाला दिली तदनंतर सदर तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान (१) श्री.विशाल रामरावजी हरणे(पोलीस हवालदार) ब.न.१९१८,स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण २) श्री. प्रशांत महादेवराव ढोके,पोलीस नाईक,ब.न.१७५३,स्थानिक गुन्हें शाखा,अमरावती ग्रामीण यांनी तक्रारदार यांना ११० चे प्रतिबंधक कार्यवाही लवकर निकाली काढण्याकरिता १५०० रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
दि.२० सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान श्री.विशाल रामरावजी हरणे,पोलीस हवालदार,ब.न.१९१८,स्थानिक गुन्हें शाखा,अमरावती ग्रामीण यांनी तक्रारदार यांच्या कडून एकून लाच रक्कमे पैकी ५०० रुपये लाच रक्कम स्वीकारली वरून श्री.विशाल रामरावजी हरणे,पोलीस हवालदार,ब.न.१९१८, स्थानिक गुन्हें शाखा,अमरावती ग्रामीण यांना ताब्यात घेण्यात आले असून,नमूद आरोपीता विरुद्ध पो.स्टे. गाडगेनगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाही श्री.विशाल गायकवाड,पोलीस अधिक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र,अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथक अमोल कडू,पोलीस निरीक्षक,केतन मांजरे,पोलीस निरीक्षक,पोना/ विनोद कुंजाम , व इतर ला.प्र.वी.अमरावती यांनी केली.