
रवी शास्त्रीच्या सध्या सहकाऱ्यानंही कोच पदासाठी पुन्हा अर्ज केला !
मुंबई : कोच पदासाठी राहुल द्रविडचं नाव सर्वात आघाडीवर आहे. रवी शास्त्रीच्या सध्या सहकाऱ्यानंही कोच पदासाठी अर्ज केला आहे. टीम इंडियाचा बॅटींग कोच विक्रम राठोड याने पुन्हा एकदा बॅटींग कोचच्या पदासाठी अर्ज केला आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ या टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. शास्त्रींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध बीसीसीआयनं सुरु केला आहे.नवी व्यक्ती भारतीयच असेल असं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे.
शास्त्रींच्या कोचिंग स्टाफमधील राठोड या एकमेव व्यक्तीनं पुन्हा अर्ज केला आहे. शास्त्रींसह बॉलिंद कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनी पुन्हा एकदा अर्ज केलेला नाही. राठोडने टीम इंडियाकडून 6 टेस्ट आणि 7 वन-डे मॅच खेळल्या असून त्यामुळे अनुक्रमे 131 आणि 193 रन काढले आहेत.
तसंच 146 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 11473 रन काढले आहेत. अफगाणिस्तानच्या मॅचपूर्वी पत्रकारांशी बोलताना राठोड यांनी पुन्हा एकदा अर्ज केल्याची माहिती दिली. ‘मी बॅटींग कोच पदासाठी अर्ज केला आहे.मला संधी मिळाली तर आणखी बरंच काम बाकी आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,’ असं त्यानं सांगितलं. संजय बांगरच्या जागी 2019 साली राठोडची नियुक्ती करण्यात आली होती.