दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
उस्मानाबाद:- येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागाच्या सरचिटणीस पदी राजाभाऊ सरकाने व ओबीसी विभागाच्या सरचिटणीस पदी काकासाहेब सोनटक्के यांची निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांचा सत्कार काँग्रेस सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष अशोक जी अग्रवाल,जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलासजी शाळू, परंडा विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद ,वर्कर्स कमिटीचे अध्यक्ष शशीराज माने, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे ,बाबू तोरकड आदी पदाधिकारी उपस्थित होते.