दैनिक चालू वार्ता नादेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – महाराष्ट्र शासनाच्यावतीने विधानसभा व विधान परिषद या दोन्हीही सार्वभौम सभागृहामध्ये दि. २४ ऑगस्ट २०२२ रोजी ज्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकिय कार्याची नोंद घेऊन यथोचित गौरव करण्यात आला त्या ज्येष्ठ संसदपटू, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व आमदार तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आदरणीय डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांना *’हार्णिया’* या आजाराचा खूप त्रास होत होता त्यामुळे त्यांचे चिरंजीव प्रा. डॉ. भाई पुरूषोत्तमराव धोंडगे यांनी आदरणीय कमलकिशोरजी कदम साहेब व विख्यात तज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करून एम.जी.एम. हॉस्पिटल, औरंगाबाद येथे या आजारावर शस्त्रक्रीया करण्याचा धाडशी निर्णय घेतला. भाईंचे वय १०५ वर्ष असूनही त्यांचा फिटनेस खूप चांगला असल्यामुळे तज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रीयेसाठी होकार दिला आणि त्यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी ‘हार्णीया’ सारख्या आजारावरील शस्त्रक्रिया अत्याधुनिक पध्दतीने काल दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी एम.जी.एम. हॉस्पिटल, औरंगाबाद येथे यशस्वीरित्या करून तज्ञ डॉक्टरांनी इतिहास रचला. या वयात शस्त्रक्रीया यशस्वी होणे खूप अवघड असताना शस्त्रक्रीयेनंतर दुसऱ्याच दिवशी साहेबांची प्रकृती पूर्वपदावर येणे हा चमत्कार विख्यात सर्जन आदरणीय डॉ. प्रविणजी सुर्यवंशी साहेब, भूलतज्ञ डॉ. सोहिताताई कुलकर्णी, डॉ. श्रीकृष्ण कातनेश्वरकर साहेब, अधिष्ठाता डॉ. बोहरा साहेब, व्हॉईस चेअरमन डॉ. पी.एम. जाधव साहेब, डॉ. आनंद निकाळजे साहेब, डॉ. प्रशांत उदगीरे साहेब, डॉ. सुनिल जाधव साहेब, डॉ. मोकीम झायदी साहेब, डॉ. शानू मॅडम, डॉ. सोरा शेख, डॉ. रेणूका मॅडम व सर्व डॉक्टरांच्या टिमने घडवून आणला. डॉ. भाई धोंडगे साहेबांनी वयाच्या १०५ व्या वर्षीही मर्दबाण्याने या शस्त्रक्रीयेला सामोरे जात तज्ञ डॉक्टरांना साथ दिली. भाईंना शस्त्रक्रीया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आय.सी.यु. मधून जनरल रूममध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत चांगली व ठणठणीत असून लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे.
आदरणीय कमलकिशोरजी कदम साहेब व त्यांचे बंधू आदरणीय अंकुशरावजी कदम साहेबांनी स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन ही शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. भाईंवर करण्यात आलेल्या यशस्वी शस्त्रक्रीयेमुळे प्रा. डॉ. भाई पुरूषोत्तमराव धोंडगे साहेबांनी
आदरणीय कमलकिशोरजी कदम साहेब, त्यांचे बंधू आदरणीय अंकुशरावजी कदम साहेब व सर्व आदरणीय डॉक्टर्स, नर्सेस व हॉस्पिटलमधील स्टाफचे मनःपूर्वक आभार मानले.
भाईंच्या शस्त्रक्रीयेवेळी सौ. चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे, प्रा. डॉ. भाई पुरूषोत्तमराव धोंडगे, श्री तातेरावजी आहेर, श्री रोहिदासरावजी चव्हाण साहेब, सौ. आशाताई रोहिदासरावजी चव्हाण, श्री गोपीचंद कामाजीराव जाधव, सौ. डॉ. मनिषा पुरूषोत्तम धोंडगे, चि.. विक्रमादित्य पुरूषोत्तमराव धोंडगे, कु. नक्षत्रा पुरूषोत्तमराव धोंडगे, दत्तात्रय सुखदेव, माधवराव आंबटवाड, बालाजी परोडवाड, बाळू सोळंके, आकाश कदम, तारा मावशी आदीजण उपस्थित होते असे प्रा. डॉ. भाई पुरूषोत्तम केशवराव धोंडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन कळविले आहे.