दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- शिक्षण संस्थेचे बनावट टीईटी प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षकाविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.बनावट टीईटी प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी शिक्षकावर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सिद्ध झाले आहे.
कुशल कृष्णराव अंबाडकर (जरूड,ह.मु.टांकनगर,अंजनगाव सुर्जी) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.अंजनगाव सुर्जी येथील सिताबाई संगई प्राथमिक शाळेत शिक्षिक म्हणून कार्यरत होते.ऑगस्ट २०१८ मध्ये शिक्षक पदावर नियुक्ती त्यांची झाली होती.त्यावेळी संस्थेत कुशल नियुक्तीसाठी आवश्यक टीईटी प्रमाणपत्र सुरू करण्यात आले.त्यांनी प्रमाणपत्र योग्य असल्याचे सांगून संस्थेला प्रतिज्ञापत्र दिले.परंतु महाराष्ट्र शिक्षण परिषद,पुणे यांनी केलेल्या तपासणीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले.शिक्षकाने बनावट प्रमाणपत्र तयार करून संस्थेला सादर करून संस्थेची फसवणूक केली.त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.संयुक्त संघटना सचिव प्रसाद संगई यांनी कुशल अंबाडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.
जानेवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत बेकायदेशीररीत्या बनावट प्रमाणपत्र मिळवून पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता रद्द करून,त्यांच्यावर फौजदारी आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा तराळे यांनी ऑगस्ट महिन्यात जारी केले होते.त्यात अमरावती जिल्ह्यातील १० शिक्षकांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर त्यांना अपात्र घोषित करण्यात आले.