दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : अशोक गेहलोत यांच्याशिवाय शशी थरुर, मनीष तिवारी तसेच अन्य काही नेतेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, गेहलोत यांना सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत. अशोक गेहलोत 24 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. त्यानंतर 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला अध्यक्षपदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.