दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवर तब्बल 20 क्वॉड्रिलियन मुंग्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, 20 क्वॉड्रिलियन म्हणजे किती? तर 20 क्वॉड्रिलियन म्हणजे, 20 हजार ट्रिलियनपेक्षा जास्त मुंग्या. हे अंकस्वरुपात पाहायचं झालं तर, 20 सोबत 15 शून्य म्हणजे, (20,000,000,000,000,000). ही संख्या इतकी जास्त आहे की, ती वाचणं किंवा मोजणं जवळजवळ अशक्यच. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, या जीवांची वाढ आणि इतक्या मोठ्या प्रमाणाबाबत जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण यामुळेच मानवाला त्यांचं महत्त्व आणि पर्यावरणाचं चक्र सुरु ठेवण्यासाठी हे जीव बजावत असलेल्या भूमिकांची जाणीव होईल.