दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
डाक कार्यालयाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा निमित्याने डाक अधीक्षक नांदेड यांच्या आदेशाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले. डाक विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, सध्याला चालू असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता विशेषत: तरुण पिढीने समोर येऊन रक्तदान करावे. रक्तदान करून रक्ताचे नाते निर्माण करू अशी प्रतिक्रिया डाक निरीक्षक बी. ए.मुंडे यांनी दिली.
या रक्तदान शिबिरास डाक निरीक्षक बी. ए. मुंडे, पोस्टमास्टर मिलिंद देऊळकर, तानाजी शिंदे, संतोष शिंदे, एस.एन. सुरकुटलावर, पोस्टल असिस्टंट विनोद दासरवाड, बाबू सोळंके, कल्पे सर, बालाजी जाजनुरे, आखले, विशाल बिल्लाळे, सुनील बोईनर, राजकुमार चोपडे, अब्दुल रहीम पाशा पटेल, पत्रकार जावेद अहमद आदी कर्मचारी व मान्यवरांची उपस्थिती होती.
इंडियन रेड क्रॉस ट्रस्ट नांदेडच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.