दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:दिनांक २३ सप्टेंबर रोजी शेळगाव तालुका देगलूर येथे युवा नेते माजी सरपंच माश्री सुरेश मिसाळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिन,दलित गोर-गरीब वृद्ध, शेतकरी, शेतमजूर, रुग्णांना मोफत वैद्यकीय हिच खरी ईश्वर सेवा व पुजा समजून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत भव्य नेत्ररोग तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगीचे छायाचित्रे यावेळी आमदार जितेंद्र अंतापुरकर, माजी जिल्हा परिषद सभापती मा श्री माधवराव मिसाळे सर, माजी सभापती मा श्री शिवाजीराव देशमुख बळेगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील , माजी उपनगराध्यक्ष माश्री अविनाश निलमवार, माजी पं.स.सदस्य बरसमवार, देविदास जाधव तडखेलकर,आदीसह गावातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, वृद्ध माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर माणिक कोकले कुरुडगीकर यांनी केले