दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संगणक सुविधा आली आहे. पण हे संगणक अजूनही अनेक भागात गेलेले नाहीत त्याचा वापर संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांच्या घरी संगणक वापर करत आहेत. त्याचा उपयोग गावातील जनतेला होत नाही. तरी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच कंधार तालुक्यातील सर्कल व आठवडी बाजार भरतात त्या बाजारासाठी महिला व पुरूष वर्ग मोठ्या प्रमाणात येतात पण महिलांना खूपच अडचणीचा सामना करावा लागतो . कारण काही ठिकाणी शौचालय असूनसुद्धा त्याचा वापर करण्यासारखे नाहीत. ते घाणीने पुर्ण पणे भरले आहेत. तेव्हा प्रत्यक्षपणे चौकशी करून, सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावेत व होणारी अडचण थांबवावी असे सामाजिक कार्यकर्ते श्री. गोविंद व्यंकटी जाधव, श्री. विभुते माधव शंकरराव, श्री. कंधारे पांडुरंग व्यंकटी यांनी जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व गटविकासज्ञ अधिकारी पंचायत समिती कंधार यांना निवेदन सादर करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.