दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कौठा :- कंधार तालुक्यातील कौठा येथे जिल्हा परिषद केंद्रीय शाळा व कन्या शाळा येथील विद्यार्थ्यांनी खरी कमाई म्हणजेच आनंद नगरी व बालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्वत तयार करून विद्यार्थ्यांनी आणले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ उपसरपंच गंगाधर हात्ते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोत्तावार यांच्या हस्ते करण्यात आला. खाऊ जत्रा निमित्त शाळेत विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टाॅल उभे करण्यास आले होते. यावेळी गावातील प्रभाकर पांडे, पप्पू हात्ते, संदीप मुद्दे, हावगी पन्नासे, नागेश गजरे, मुख्तार शेख, या सर्व गावकऱ्यांनी आनंद नगरीला भेट देऊन खाद्यपदार्थ खरेदी केले. विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ स्वत तयार केल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख संतोष दिनकर, मुख्याध्यापक बालाजी पवळे, रामेश्वर बुच्चे, दिलीप चव्हाण, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी शिंपाळे, ललिता मजरे,चित्रा लुंगारे या सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. आनंद नगरी व बालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.