दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
जळगांव जिल्ह्यांतील अमळनेर तालुक्यांतील नेव्ही गावांचे सुपुत्र शुभम बाळु बिहाडे यांचे देशसेवा बजावत असताना वीरमरण आल्याची माहिती लष्करी विभागाकडूंन देण्यांत आली. जवान नौदलातील (नेव्ही) शुभम बिहाडे वय (२६) हे कर्तव्यावर असताना दि.२३ रोजी सकाळी मुंबई-कुलाबा येथील मुख्यालयांतील कवायत मैदानावर कर्तव्यांवर असताना हृदयविकारांचा झटका आल्यांने जवान शुभम बिहाडे यांचे दुःखद निधंन झाले. गेले सहा वर्षांपूर्वी शुभम बिराडे भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाली होती त्यांना गीत ,गायन वाद्यांची चांगलीच आवड होती ते मनमिळावू होते त्यांच्या निधनांची बातमी कळताच शहरांत सर्वत्र शोककळा पसरली. शुभम बिहाडे यांच्यावर रविवारी दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी लष्करी दलाच्या वतीने आणि जळगांव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देवुन त्यांना अखरेचा निरोप देण्यांत येणार असल्यांची माहिती जळगांव जिल्हा पोलीस दलाकडूंन मिळाली त्यांच्या पश्चात आई,वडील पत्नी ,बहिण,भाऊ त्यांचा परिवार होता. शुभम बिहाडे यांच्या अचानक जाण्यांमुळे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांना चांगलाच धक्का बसला. तसेच नातेवाईकांचा आक्रोंश मनाला हेलावणारा होता. शहीद जवान शुभम बिहाडे यांच्या जाण्यामुळे यावेळी सातारा जिल्ह्यांचे राज्यस्तरीय पत्रकार श्री.पुरीगोसावी यांनी सोशल मीडिया वरुन शोक व्यक्त केला.