दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
पन्हाळ्यातील युवानागरिकांनी तीन दरवाजा तटबंदी उडी मारून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचे जीव वाचवण्यासाठी धावले व्यवसायिक हा विद्यार्थी संध्याकाळी सातच्या दरम्यान तीन दरवाजा परिसरात फिरत होता. जसं अंधार होऊ लागला तसेच ताटाकडे गेलेला काही नागरिकांना तो दिसला होता. धुके किल्ल्यावर पसरले होते. आज पर्यटकांची वर्दळ कमी होती सर्वत्र शांतता पसरली होती तटा खालून आई घे! आई ग ! मला वाचवा! असा आवाज येथील व्यवसाय करणार येऊ लागला होता. मग सर्व व्यवसायिक एकत्र जमलेत व तटाखाली लाईट पाडून पाहिल्यानंतर तीन दरवाजाच्या खालच्या रस्त्यावर एक विद्यार्थी तडफडत असताना व्यवसायिकांना दिसला व्यवसायिक पहिल्यांदा पोलीस स्टेशनला गेलेत त्यानंतर दवाखान्याची संपर्क साधण्याचा प्रयत्न लोकांनी केला. त्याच्याजवळ गेली असता नागरिकांनी त्याला नाव व गाव विचारले व त्या मुलगा ने नाव व पत्ता सांगितले . गुडे सोमवार पेठ कडे जाणारे गाड्या त्याच्याकडे गाडीवरूनच पाहत होते पण मदतीसाठी कोनेही येत नव्हते हे सर्व व्यावसायिक तटावरून पाहत होते. एवढ्यात सर्व व्यवसायिक एकत्र झाले ताटाखाली उतरले व त्याला झोली करून पन्हाळगडाच्या तडबंदी खालून वर आणले त्याला तटबंदी खालून वर आणून अक्षरशा पळत आणून दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न पन्हाळा तीन दरवाजा परिसरातील व्यवसायिकांनी केला आहे. आत्महत्या करणाऱ्याचे नाव, अभिषेक दिलीप करंजे राहणार पाचगाव, कोल्हापूर असे कळाले आहे. एस एम लोह्या चा विद्यार्थ्यां आहे.युनिफॉर्म त्यांनी घातला आहे.तो सध्याचा स्थितीला गंभीर जखमी असला तरी बोलत आहे.पन्हाळ्याच्या नागरिकां सतर्कतेमुळे त्याची जीव वाचवण्यात नागरिकांना यश आले आहे. मग त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले आहे पुढील औषधासाठी उपचारासाठी त्याला कोल्हापूर C P R रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. इथे स्थानिक नागरिकांमुळे ग्रामीण रुग्णालय मध्ये नागरिक ॲम्बुलन्स बोलवण्यासाठी गेल्यानंतर ड्रायव्हर नाही असे सांगण्यात आले तसेच त्यानंतर आमच्याकडे ड्रायव्हर उपलब्ध आहे असे नागरिकांनी सांगितले दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी चावी द्या चावी सुद्धा आमच्याकडे नाही असे दवाखान्यात सांगण्यात आले तसेच पन्हाळा पोलिसांना कळवल्या नंतर कोणीही सुरुवातीला दाद घेत नव्हते मग नागरिकांनी अक्षरशा त्याला झोली करून दवाखान्यापर्यंत आणले आहे दीड तासानंतर108 ॲम्बुलन्स कोल्हापुरातून आली. त्यामुळे पन्हाळा नागरिका मध्ये अशी चर्चा होती की तालुका स्तर नुसता नावालाच आहे का? इथे एक साधी अंबुलन्स उपलब्ध होऊ शकत नाही तालुकास्तर असून सुद्धा एक ॲम्बुलन्स नाही दवाखान्यात सोय नाही आरोग्य यंत्रणाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. हि एक शोकांतिका म्हणावी लागेल. अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे करत आहेत.