दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
वाई तालुक्यांतील व्याजवाडी गावचे सुपुत्र जवान विजय सुदाम कुदळे (वय३४) हे भारतीय सैन्य दलामध्ये आयटीबिपीन मध्ये कर्तव्य बजावत होते. सातारा जिल्ह्यांतील वाई तालुक्यांतील सैनिकांचे राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्यांची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारांस समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा चांगलाच हादरला. याबाबत सातारा शहर पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन माहितीवरुन विजय सुदाम कुदळे हे साताऱ्यातील आपल्या गावी सुट्टीवर आले होते. जवान विजय कुदळे आपली रजा संपवून ड्युटीवर हजर होणार होते.पण यापूर्वी त्यांनी साताऱ्यांतील अमरलक्ष्मी येथील पेरणा सोसायटीमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारांस छताच्या हुकाला ओढणीच्या साह्यांने गळफास घेवुन आपली जीवन यात्रा संपवली घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली घटना स्थळाचा पंचनामा करण्यांत आला. जवान विजय कुदळे यांनी आत्महत्या कोणत्या कारणांतून केली हे समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास सातारा शहर पोलीस करीत आहेत. जवान विजय कुदळे यांच्या पश्चांत पत्नी एक मुलगा असा त्यांचा परिवार होता. जवान विजय कुदळे यांच्या घटनेमुळे सातारा जिल्ह्यांसह संपूर्ण वाई तालुका चांगलाच हादरला.