
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मोखाडा
अनंता टोपले
आमदार सुनिल भुसारा यांचे रात्री दिड पर्यंत मदत कार्य
आमदार आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक वाहन चालकाने केली प्रयत्नांची पराकाष्ठा
वाहन पलटी झाल्याने गाडीखाली दबुन झाले जखमी
मोखाडा आदिवासी भागात रोजगार नसल्या कारणाने रोजगारासाठी गेलेल्या युवकांना घरी परतण्यास उशिरा गाडी मिळाली दिवाळी निमत घरी येत असताना ही गाडी त्रेम्बक मोखाडा घाटात पलटी झाली होती विक्रमगड विधान सभेचे आमदार सुनील भुसारा हे त्या महामार्गाने गावी येत असताना रात्री 11च्या सुमारास त्यांना ही घटना दिसली असता त्यांनी कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी थांबून त्यांना मदत करण्याचा प्रेतन केला
मोखाडा त्र्यंबकेश्वररस्त्यावर भांगेबाबा मदिराजवळील अपघाती वळणावर पुन्हा एकदा मोठा अपघात होवून रात्री ११ वाजेच्या सुमारास मोठे लोखंडी मशीनी घेवून जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी होवून अपघात घडला मात्र जव्हार मोखाडा वरुन नाशिकला कामाला जाणाऱ्या मजुरांना परतण्यासाठी उशीर झाल्याने या वाहनांचा आसरा घ्यावा लागल्याने या गाडीत असलेल्या तब्बल १३ मजुर जखमी झाले असून यातील ५जणांची प्रकृती चिंताजनक आहे यातील गंभीर जखमीना नाशिक तर बाकीना त्रंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे या अपघाती वळणावर कडक उपाययोजना करण्याचा तसेच मालवाहतूक मोठ्या वाहनांना मधून प्रवासी वाहतूक करण्याचा मुद्दा आता एरणीवर आला असून या बाबत कडक धोरण अवलंबवायाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नाशिकहुन गुजरात कडे निघालेल्या डीएन ९ एल ९२०२ या आयशर कंपनीच्या ट्रक मध्ये विविध प्रकारच्या लोखंडी मशीनी होत्या तसेच त्यात काहि मजुरही प्रवास करीत होते अशावेळी मोखाडा हद्दीत नेहमीच तीव्र उतारानंतर येणाऱ्या अपघाती वळणार हा ट्रक पलटी झाला मात्र यातील सामान प्रवास करणाऱ्या लोकांच्या अंगावर पडून हे तरुण जखमी झाले यामध्ये रवी जयराम घाटाळ रा.तुळ्याचापाड मोखाडा, नंदु भोये रा तुळ्याचापाडा मोखाडा, सुनिल चंदर घाटाळ रा तुळ्याचापाडा मोखाडा, यशवंत गुदर रा .खोच मोखाडा, प्रमोद दिवे रा.कोंडीचापाडा जव्हार, विशाल किन्नर रा.कोंडीचापाडा जव्हार,यर्वीस दिघा रा.काळशेती, जव्हार,रवींद्र दिघा रा. काळशेती जव्हार,ईश्वर गुरा रा. गांधीपुल मोखाडा,अंकुश कोरडा कोंडीचापाडा जव्हार, तशार वाझे, कोंडीचापाडा जव्हार,दिप दिघे कोंडीचापाडा जव्हार हे जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचार सुरू आहेत
आमदार सुनिल भुसारांच्या यांनी वाचवला अनेक लोकांचा जीव
विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा हे आपल्या परीवारासोबत याच रस्त्याने घरी परतत असताना काहिवेळा पुर्वीच झालेल्या या अपघात स्थळी पाहीले असता या ट्रक मधील लोखंडी समानात दडपून असलेल्या अपघात ग्रस्त मदतीसाठी टाहो फोडत होते अशावेळी भुसारा यांनी स्वतः आणि त्यांचे सुरक्षारक्षक देवीदास गवळी सतिषमाळी आणि चालक मोईन पठाण यांनी या गुतलेल्या मजुरांना सुरक्षित काढण्यास सुरवात केली एवढेच नाहीतर भुसारा यांनी भ्रमणध्वनीवरुन मोखाडा पोलिसांना कळवले तसेच मोखाडा येथील काहि तरुणांनाही मदतीसाठी बोलावले तर ग्रामीण रुग्णालयातही कळवून रुग्णवाहिका मागवल्या यावेळी अक्षरश हे मदत कार्य करताना हात सुद्धा रक्ताने माखल्याचे चित्र दिसून आले यावेळी तात्काळ त्र्यंबकेश्वरजखमींची अवस्था बघून त्यांना नाशिक त्र्यंबक याठीकाणी उपचारासाठी पाठवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला एवढेच नाही तर आपले सुरक्षारक्षक वाहन चालक यांना या रुग्णांसोबतच पाठवून देत ते स्वतः वाहन चालवत निघाले तसेच या लोकांना तात्काळ रुग्णवाहिका किंवा कसलीही मदत पैशाअभावी थांबु नये यासाठी रोख रक्कमही या जखमींसोबत पाठवून दिली यासगळ्यामध्ये ११ वाजेपासुन तब्बल दिड वाजेपर्यंत आमदार भुसारा हे आणि त्यांचा परीवार आणि संपूर्ण टीम या लोकांचे जीव वाचावे यासाठी धडपडत होती हे सगळ मदत कार्य वेळेवर नसते झाले तर कदाचित या ट्रकखाली दबून जीवीतहानी झाली असती यामुळे एन दिवाळीच्या मोक्यावर या घरातील दिवे विझण्यापासुन वाचले आहेत भुसारांच्या या मदत कार्याची सर्वकडे प्रशंसा होत आहे