दैनिक चालु वार्ता सिडको प्रतिनिधी- विक्रम खांडेकर
.बोरगाव (आ) या गावांमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी सन 2020 – 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी लोकांचा पराभव करून सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी सतत कार्य करणाऱ्या पुंडलिकराव हारजी पाटील यांच्या व त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे पॅनलचे संपूर्ण नवीन सदस्य बहुमताने निवडून देऊन सत्ता परिवर्तन केले .
यात सरपंच व सर्व सदस्यांनी एका वर्षाच्या आत गावातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून ,गावातील विकास कामे करण्यास सुरुवात केली. गावातील ग्रामपंचायत सदस्य, यांच्या सह विविध क्षेत्रातील गावातील १०० जणाचे पथक आदर्श गाव असलेल्या पाटोदा जिल्हा छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथे ग्रामविकास कसा असावा पाहणी दौरा साठी सहभाग नोंदविला आहे. आदर्श गाव बनविण्याचा संकल्प केला आहे.
लोहा तालुक्यातील बोरगाव आ. गावाने एक वर्षाच्या कालावधीत सुनेगाव ते बोरगाव अशी सार्वजनीक पिण्याचे पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्या विहिरीचे काम पूर्ण केले आहे तर श्री. गुरुविरशाप्पा महाराज देवस्थान मंदिराचे सभामंडपाचे नवीन काम सुरू केले आहे. कब्रस्तानच्या कंपाउंड वॉल चे बांधकाम, शेतकऱ्यांना लागणारे पांदन रस्ते हि व इतर विकास कामे होत असताना गावातील नागरिकांचा ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या विकास कामांमध्ये सहभाग वाढावा व आमचे गाव समृद्ध, परिपूर्ण व आदर्श गाव व्हावे हा शूद्ध हेतू मनात धरुन विकासाची गंगा घरोघरी हा वसा घेतलेली ग्रामपंचायत बोरगाव आ.ता.लोहा.येथील शंभर (100) सदस्यांचा आदर्श गाव पाटोदा जिल्हा छ. संभाजीनगर पाहणी दौरा आ. श्यामसुंदरजी शिंदे,विधानसभा लोहा कंधा यांच्या ग्रामविकास कसा असावा या संकल्पनेतून व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख पुंडलिकराव हारजी पाटील यांच्या पुढाकारातून, विकास सुरू असलेले ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव आ. ता. लोहा जि. नांदेड च्या वतीने गावातील वेगवेगळ्या जाती धर्मातील व वेगवेगळ्या वयोगटातील काही ज्येष्ठ नागरिक, सरपंच,उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष,तसेच गावातील सुशिक्षित गट व गावासाठी सेवाभावाने काम करणारा गट,काही नवतरुण, महिला,अंगणवाडी सेविका,अशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्या व काही विरोधी गटाचे सदस्य असे गावात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 100 सदस्यांचे पथक
या दौऱ्यामध्ये गावातील पॅनल प्रमुख पुंडलिकराव हरजी पाटील,सरपंच सौ. कांताबाई तुळशीराम हंकारे, उपसरपंच सौ.जयश्री पुंडलिकराव पाटील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य , ग्रामविकास अधिकारी एम.सी.सय्यद व गावातील ज्येष्ठ नागरिक हैबतराव पाटील,शामराव पाटील, भिमराव पाटील,पांडुरंग रामजी पाटील, अशोक पाटील,तुळशीराम हंकारे, गंगाधर आंबेगाव, जिल्हा परिषद शाळा शिक्षक प्रतिनिधी फुलसे अंगणवाडी शाळा प्रतिनिधी सौ. वैशाली पाटील व सौ.नंदाताई पाटील, सौ.मुक्ताबाई श्रीसागर, श्रीरंग पाटील गायकवाड, राजू महाराज स्वामी, व्यंकटेश पाटील, किरण पाटील, श्री विश्वनाथआप्पा भंडारे अजित पाटील बोरगावकर ह्या व गावातील इतर नागरिकांनी आदर्श गाव पाटोदा येतील पाहणी दौऱ्यात सहभाग नोंदविला. बोरगाव गाव हे आदर्श गाव बनविण्याचा संकल्प केला आहे.