दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी जालना-संभाजी गोसावी जिल्ह्यांतील जिल्हा कार्यकारिणी आणि जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाची रविवार दिनांक २५/०९/२०२२ रोजी सकाळी मराठवाडा शिक्षक संघाची जुनी पेन्शन/ अनुदान अस शैक्षणिक कामे याबाबत धडक मोर्चा गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत असा धडक मोर्चा काढण्यांत येणार असून याबाबत कोणत्याही देशाची प्रगती व देशातील शिक्षकांनी शिक्षणाशी संबंधित घटकाची स्थिती यावर अवलंबून असते.अंशदायी पेन्शन योजना लागू केली ही योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आमची या मोर्चाच्या माध्यमांतून राज्य शासनांकडे मागणी करीत आहोत.या धडक मोर्चामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव जिल्हा कार्यकारिणी सर्व कमिटी सर्व सदस्य व सर्व जनसमुदाय यावेळी उपस्थित राहून हा धडक मोर्चा काढण्यांत येणार आहे. या होणाऱ्या धडक मोर्चा मध्ये श्री. सूर्यकांत विश्वासराव ( केंद्रीय अध्यक्ष) श्री. डॉ. मारुती तेगमपुरे (मार्गदर्शक) श्री. ज्ञानोबा वरवंटे (केंद्रीय उपाध्यक्ष) श्री. नारायण मुंडे (कोषोध्यक्ष) श्री. भीमाशंकर शिंदे (सहसचिव) तसेच मराठवाडा जालना जिल्ह्यातील सदस्य जिल्हा मार्गदर्शक प्रसिद्धीप्रमुख कार्यकारणी अध्यक्ष व शिक्षक-शिक्षिका कर्मचारी या विविध मागण्यांकरिता धडक मोर्चामध्ये सहभागी होणारा असून आपल्या हक्काच्या आणि आपल्या मागण्यांबाबत सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्यांचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळ व अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यांत आले आहे.
Related Stories
5 days ago