दैनिक चालू वार्ता अहमदनगर जि.प्रतिनिधी-संभाजी गोसावी
नेवासा फाटा येथे काही लॉजिंग चालक अवैध अवैधरित्या वेश्याव्यवसाय चालवत असल्यांची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यासाठी परप्रांतीय तरुणींचा वापर केला जात होता अशी ही माहिती पोलीसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पाच पोलीस ठाण्यांचे विविध पथके तयार करुन बुधवारी सायंकाळी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील चार लॉजवर एकाच वेळी छापे टाकण्यांत आले. यावेळी तीन लॉजवर सात परप्रांतीय तरुणीच्या माध्यमांतून अवैध वेश्या व्यवसाय सुरु होता पोलिसांनी या तरुणींना ताब्यांत घेतले. या कारवाईमध्ये हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल करण्यांत आले.असून यांच्यासह हॉटेल मॅनेजरवर अनैतिंक व्यापार प्रतिबंधक कायदा अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला. यावेळी हॉटेल तिरंगा इथून ३ तर हॉटेल नाथगंगा इथून ३ आणि हॉटेल पायल इथून अशा ७ पीडित मुलींची सुटका करण्यांत आली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगांव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व नेवासा पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक विजय करे, सोनाई पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी यांच्यासह सुमारे २० ते २५ पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या या कारवाईने नगर-औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल व्यवसाय चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.