
दैनिक चालु वार्ता
बिड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बिड -दोन वर्षात कोरोनाने थैमान घातलेले असताना मेडिसिन विभागाचे तज्ज्ञ डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात येऊ नये म्हणून महिन्याला एक ते दीड लाख पगार उचलणारे डॉक्टरांनी सुद्धा विविध कारणे दाखवून रुग्णालयातून पळ काढला त्यावेळी कोरोणा बाधित रुग्णावर उपचार कंत्राटी कर्मचारी डॉक्टर स्टाफ नर्स स्वच्छता कर्मचारी करत होते त्यापेक्षा ही अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडणारे कोरोना रुग्णांची चाचणी करणारे लॅबमधील टेक्निशियन डाटा एंट्री ऑपरेटर तसेच स्वच्छता कर्मचारी हे होते काम सरो वैद्य मरो म्हणीप्रमाणे शासनाने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयांमधील तब्बल ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार गेली सहा महिन्यापासून न केल्यामुळे आज त्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच होते आहे वैतागून ते कर्मचारी म्हणताहेत नको पुरस्कार नको सत्कार हवा फक्त आमच्या हक्काचा पगार अंबेजोगाईच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या संवेदना शिल्लक राहिल्यात की नाही? असा प्रश्न पगारी बिना पीडित कंत्राटी कर्मचारी यांना महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य बीड जिल्ह्यातील बीड लोखंडी सावरगाव आंबेजोगाई या तीनच ठिकाणी कार्यरत रुग्णालयात कोरणा बाधित रुग्णावर उपचार झाले दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरणा बाधित रुग्णांची रक्त व इतर तपासणी ची सुविधा आंबेजोगाईत व्हावी यासाठी आंबेजोगाईच्या रुग्णालयाला कोरोना चाचणी लॅब तातडीने मंजूर केली त्यावेळी त्या लॅब मध्ये काम करण्यासाठी कायमस्वरूपी नियुक्तीला असणारे कर्मचारी कोणीही काम करायला तयार नव्हते कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यामध्ये नेमणूक दिली हे कंत्राटी कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले सर्वात जास्त तपासणी करणारी आंबेजोगाईची लॅब जिल्ह्यात ठरली मात्र जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी काम करत असतात मात्र त्यांची दिवाळी पगारी विनाच प्रशासनाने ठेवली