दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार -बाजीराव गायकवाड
कंधार:- पेठवडज येथे लंपी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरण दिनांक 25 सप्टेंबर रोजी घेण्यात आले. यावेळी पेठवडज पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवि तेप्पावार ,डा.एस व्ही टांपरे, पेठवडज येथील 350 जनावरांना लंपी आजार प्रतिबंध देण्यात आले .उर्वरित जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. असे डॉक्टर कडून सांगण्यात आले आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत आणखी येथील पशुपालकांच्या जनावरांना टप्प्याटप्प्याने लसीकरण देण्यात येणार आहे असे आपल्या येथील लसीकरणा परिसरात खाजगी सेवादाता अनिल कोडमवार, श्रीराम परतवाड,संभाजी शेटवाड,पाडुरंग परतवाड,विजय गायकवाड,सचिन सरोदे,आणि परिचार नन्नुरे रामदास,प्रल्हाद केंद्रे,जितेद्रं चावरेअन्य पशुपालक उपस्थित होते.